शिरपूर पोलीस स्टेशनवर धडकला मोर्चा,आबा भगत यांचा संशयास्पद मृत्यू,तात्काळ चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी

बातमी कट्टा:- शिरपूर येथील मांडळ रोडवर 67 वर्षीय रमेश कोळी (आबा भगत) यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी दुखापत होऊन रक्तश्राव झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते बंद दुकानाच्या ओट्यावर मृतदेह आढळून आला होता. या घटनेची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी वाल्मिक नगर येथून महिलांसह मोठ्या प्रमाणात मोर्चा आज दि 11 रोजी शिरपूर पोलीस स्टेशनवर धडकला होता.

बघा व्हिडीओ

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील वाल्मिक नगर येथील रमेश लहु कोळी (आबा भगत) वय 67 वर्षीय या व्यक्तीचा मांडळरोडवर संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची घटना दि 8 रोजी घडली होती. रमेश कोळी यांचा मृतदेह एका बंद दुकानाच्या ओट्यावर आढळून आला होता.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीसांनी धाव घेत चौकशी करण्यात आली होती.

On YouTube

यानंतर रमेश कोळी यांचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.घटनेची माहिती सर्वत्र पसरताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.रमेश कोळी यांच्या नातेवाईकांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.या घटनेबाबत शिरपूर शहर पोलीसांकडून कुठलाही उलगडा झाला नसल्याने आज दि 11 रोजी वाल्मिक नगर येथील मुकमोर्चा शिरपूर शहर पोलीस स्टेशनवर धडकला.घटनेची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.मोर्चात तरुणांसह मोठ्याप्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला होता.

बघा व्हिडीओ
WhatsApp
Follow by Email
error: