
बातमी कट्टा :- धुळे जिल्ह्याला मंत्री मंडळ विस्तारात मंत्रीपद देणे आवश्यक होते कारण धुळे जिल्ह्यात एकूण ५ विधानसभा मतदार संघ आहेत. व त्यापैकी ३ भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत.असे असतांना जिल्ह्यास मंत्रीपद मिळाले नसल्याची खंत व्यक्त करत धुळे जिल्ह्यातील तीन पैकी एका आमदरांची तरी मंत्रीमंडळात वर्णी लागावी या आशयाचे निवेदन आज धुळे दौऱ्यादरम्यान असतांना मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले की महाराष्ट्र राज्यात मागील एक वर्षा पासून शिवसेना भाजपा महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे. व उत्तमरित्या राज्यात विकासाची व जनकल्याणाची कामे करून राज्यातील गोर गरीब शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी नोकरदार वर्ग व राज्यातील प्रत्येक घटकास न्याय देण्याचे काम करीत आहे.
सध्या राज्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची विकासाची कामे खूप वेगाने होत आहेत व आता अशा परिस्थितीत शिवसेना व भाजप युतीचे सरकार डबल इंजिनचे सरकार, आता राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत युती करून राज्यास अनुभवी उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार लाभलेले आहेत व आता राज्यात डबल नव्हे तर ट्रिपल इंजिनचे सक्षम सरकार व खूप मोठ्या प्रमाणावर व जलद विकास कामे करण्याचे सरकार या महाराष्ट्र राज्यातील जनतेस प्राप्त झालेले आहे.म्हणून राज्यात विकासाची गंगा वाहत असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत आहे.
परंतु आमच्या धुळे जिल्ह्याला या मंत्री मंडळ विस्तारात मंत्रीपद देणे आवश्यक होते कारण धुळे जिल्ह्यात एकूण ५ विधानसभा मतदार संघ आहेत. व त्यापैकी ३ भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. परंतु आमच्या जिल्ह्यास मंत्रीपद मिळाले नसल्याची खंत आमच्या मनात आहे. कारण जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक समस्या विकास कामे करण्याबाबतचे अनेक प्रस्ताव जनता मांडत असते व सामान्य जनतेस त्यांच्या समस्यांचे समाधान करणे व मतदार संघात विकास कामे करण्यसाठी खूप मोठ्या प्रमाणावर अर्थित निधीची गरज भासत असते त्यावेळेस आमच्या जिल्ह्यातील विकास कामे मंदवाण्याचे देखील चित्र दिसत असते.परंतु जर एखाद मंत्रीपद आमच्या जिल्ह्यास दिले तर राज्याच्या विकास गंगेमध्ये आमच्या धुळे जिल्ह्याचे काही विकास कामे मार्गी लागतील व न्याय देखील मिळेल.जयकुमार भाऊ रावल (माजी पर्यटन मंत्री) शिंदखेडा मतदार संघ,अमरिशभाई पटेल (माजी शिक्षण मंत्री) विधान परिषद आमदार,मा. काशिराम दादा पावरा शिरपूर मतदार संघ यांच्या पैकी एक तरी आमदारांना मंत्री मंडळ विस्तारात संधी देऊन धुळे जिल्ह्यास देखील मंत्रीपद देऊन आपल्या कडून न्याय मिळेल व ट्रिपल इंजिनच्या सरकार कडून धुळे जिल्ह्यास देखील न्याय मिळेल अशी आशा नागरिकांमध्ये असल्याचे निवेदनाद्वारे मांडण्यात आले आहे.
निवेदनावर योगेश मानसिंग देशमुख रा.आमोदे ,भारतसिंग मानसिंग राजपूत,रविंद्र नारायणविंग गिरासे, मिलिंद नागो मोरे रा.शिरपूर, जितेंद्र रामदास माळी,रोहिदास हिरजी चौधरी,दिलीप विजयसिंग देशमुख आमोदे,रमेश शुकलाल चौधरी यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.