लाच घेणाऱ्याला धुळे एसीबीने घेतले ताब्यात, खाजगी ईसमसह पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक विरुध्द गुन्हा दाखल

बातमी कट्टा:- गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येऊ नये म्हणून तक्रारदाराकडे पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांच्या सांगण्यावरून खाजगी पंटरने 5 लाखांची लाचेची मागणी केली होती.याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने सापळा रचत 3 लाखांची लाच स्विकारतांना खाजगी पंटरला ताब्यात घेत खाजगी पंटरसह पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व त्यांचा मित्र असे दि.14 रोजी कामानिमीत्त जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे आले असता जामनेर चौफुली येथे त्यांच्या मित्रास त्यांचे परिचीत भुसावळ येथे राहणारे ऋषी शुक्ला भेटले. तेव्हा त्यांनी तक्रारदार यांच्या मित्रास भुसावळ बाजारपेठ पोस्टे येथे दि.13 रोजी गु.र.नं. ३५९/२०२३, भा.द.वि. कलम व इतर कलमान्वये सारंगधर महादेव पाटील व राजीवकुमार राजकिशोर यादव यांचे विरुध्द गुन्हा दाखल झाला असुन त्यात त्यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याचे सांगुन आरोपी व्हायचे नसेल तर पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व तपासी अधिकारी सहा.पोलस निरीक्षक सांगळे यांना ५,००,०००/- रुपये द्यावे लागतील. असे सांगुन त्यांना साहेबांसमोर येवु नको नाहीतर ते तुला आरोपी करतील. म्हणुन तु तुझ्या मित्रास त्यांचे सोबत साहेबांची भेट घेण्यास पाठव असे सांगीतले होते. त्यानंतर तक्रारदार व त्यांच्या मित्राची आपसात चर्चा होवुन आज दि. 18 रोजी ऋषी शुक्ला यांची भेट घेवून बोलणी नंतर साहेबांची भेट घेण्याचे ठरले असल्याची तक्रारदार यांनी ला.प्र.विभागाकडे दुरध्वनीवर माहीती दिली होती. सदर माहीती वरुन धुळे ला.प्र. विभागाचे पथकाने भुसावळ येथे जावुन तक्रारदार यांना भेटुन त्यांची तकार लिहून घेतली होती.

सदर तकारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान खाजगी ईसम ऋषी शुक्ला यांनी तक्रारदार यांचेकडे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व तपासी अधिकारी सांगळे यांच्याकरीता ५,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस नाईक तुषार पाटील, भुसावळ बाजारपेठ पोस्टे यांच्या सांगण्यावरुन व प्रोत्साहीत केल्यावरुन खाजगी इसम ऋषी शुक्ला यांनी त्यापैकी ३,००,०००/- रुपये लाचेची रक्कम विचवा ता.बोदवड येथे भुसावळ- बोदवड रस्त्यालगत स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस नाईक तुषार पाटील व खाजगी ईसम ऋषी शुक्ला बोदवड, पोस्टे जि. जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७अ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला,भुषण शेटे, भुषण खलाणेकर, गायत्री पाटील, वनश्री बोरसे, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: