शिकारीला आलेल्या शिकाऱ्यांची वनविभागाने केली शिकार,सहा जण ताब्यात

बातमी कट्टा:- रात्रीच्या सुमारास शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरतांना सहा संशयितांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन ठासणी बंदुकांसह छर्रे व पावडर जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर वनक्षेत्रातील भोरखेडा /असली राखीव वन कंपार्टमेंट जंगलात दि 30 रोजी रात्रीच्या सुमारास अंधाराच्या फायदा घेत सहा संशयित शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती शिरपूर वनविभागाच्या पथकाला प्राप्त झाली होती.त्या माहिती नुसार वनविभागाच्या पथकाने जंगलात जाऊन  महेंद्र सुरेश पावरा,विश्वास विजेंद्र पावरा,राकेश लालसिंग पावरा,सनस लालसिंग पावरा,अजित कालुसिंग पावरा सर्व रा.टिटवापाणी (चिलारे) यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या कडून दोन ठासणी बंदूक,13 छर्रे,टॉर्च 2 आणि काळी पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शिकार करण्याच्या उद्देशाने रात्री जंगलात फिरत असल्याचे सांगण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही नितीन कुमार सिंग (उपवनसंरक्षक ,धुळे) व आनंद कुमार मेश्राम (सहाय्यक वनसंरक्षक ,शिरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली के.पी. पाटील वनपाल हिसाळे,आर.ई. पाटील वनपाल रोहिणी व  के.आय साळुंखे वनरक्षक दहीवद व देवीदास पाटील वनमजुर हिसाळे,कैलास शिरसाट,विशाल शिरसाट वाहनचालक व राजेंद्र माळी वनमजूर शिरपूर आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: