दिवसाढवळ्या नंदुरबार चौफुलीवरील शिववंदना रहिवासी अपार्टमेंटमधुन दुसऱ्यांदा चोरी…

बातमी कट्टा:- दोंडाईचा येथील दै. देशदुतसारख्या वुत्तपत्रापासुन गावातील विविध समस्यांवर वाचा फोडणारे पत्रकार श्री समाधान संतोष ठाकरे यांची हिरो कंपनीची मोटरसायकल आज सकाळी चोरीला गेली असल्याचे निदर्शनास आले असुन,ह्याच रहिवासी अपार्टमेंटमधुन महिन्याभरात ही दुसरी चोरीची घटना‌ चोरांकडुन लक्ष केले गेल्याचे नागरीकांमध्ये बोलली जात आहे. त्यामुळे जर कोणास वरील हिरो कंपनीची मोटरसायकल दिसल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील नंदुरबार चौफुलीवरील सौरभ मंगल कार्यालय मागील शिववंदना अपार्टमेंटमध्ये दै.देशदुतचे पत्रकार श्री समाधान संतोष ठाकरे हे राहतात.काल दिनांक ३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे रात्री साडेदहा वाजता हिरो कंपनीची लाल-ब्लॅक कलरची मोटरसायकल एम.एच.३९-एस-४१४३ ही घरापुढील पार्कींग जागेत लावली.यावेळी अपार्टमेंटमधील इतर रहिवासी लोकांच्या गाड्याही त्याठिकाणी लावलेल्या होत्या.मात्र सकाळी सहा वाजता श्री ठाकरे नेहमीप्रमाणे घराबाहेर फिरायला निघाले असता, मोटरसायकल रात्री लावलेल्या त्याच जागेवर दिसत नसल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केल्याची पक्की खात्री झाली.तरी त्यांनी दुपारपर्यंत इतरत्र शोध घेतला.मात्र मिळून न आल्याने पोलीस दप्तरी लेखी व तोंडी नोंद केली आहे.

तरी गावातील पत्रकार बांधव हे अनेकांच्या सुखदुःखात,अडीअडचणीत, लोंकाच्या समस्या-प्रश्न सोडण्यास नेहमी सहभाग घेत असतात.म्हणुन शहर व परिसरातील लोकांना जर वरील कलर-रंगाची-क्रमाकांची गाडी कोणाकडे-कुठे दिसल्यास पत्रकार समाधान ठाकरे मो.नं. ९०४९३१९८९१ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: