सांगवी येथील हिंसाचाराचा ऑन दि स्पॉट रिपोर्ट,वाचा सविस्तर..

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात बॅनर फाडल्याच्या वादातून हिंसाचाराची घटना घटना 10 रोजी दुपारी घडली.दंगलीनंतर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता यावेळी शांततेचे आवाहन करण्यासाठी गेलेले भाजपचे आमदार काशीराम पावरा, तहसीलदार महेंद्र माळी व पोलिसांच्या वाहनावरही जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.या घटनेत तीन पोलीस अधिकारी आणि 15 पोलीस कर्मचारी यांच्यासह तहसीलदारांचे वाहनचालक जखमी झाले असून 150 ते 200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.यात 13 संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून यात संशयित अल्पवयीन असून दहा संशयितांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हिंसाचाराचा घटनेनंतर काय म्हणालेत आमदार काशिराम पावरा बघा व्हिडीओ

सांगवी परिसरात 9 ऑगस्ट ला विश्व आदिवासी दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमा असलेले फलक देखील लावण्यात आले होते. दहा ऑगस्टला दुपारी त्यापैकी एक फलक फाडल्याचे वृत्त गावात पसरले आणि वातावरण तणावपूर्ण झाले.बॅनर फाडल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेला गट व दुसरा गट यांच्या दरम्यान दगडफेक झाली. लाट्या-काठ्यांचा वापरही झाला. त्यात काही जण जखमी झाले. त्यापैकी सुभाष विजय सोनवणे (वय 26), नितीन लक्ष्मण भिल (वय 18) व शिवदास आसाराम भिल (वय 40, तिघे रा. सांगवी) यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यात एक गंभीर जखमी असून त्यांच्यावर धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले होते.

सांगवी येथे पोलीस अधीक्षक दाखल,काय म्हणालेत पोलीस अधीक्षक, बघा व्हिडीओ

या घटनेनंतर संशयीतांवर कारवाई करावी या मागणीसाठी जमावातील युवकांनी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला.यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक तीन तासभर खंडित झाली होती.दरम्यान दंगलीनंतर शांततेचे आवाहन करण्यासाठी घटनास्थळी गेलेले आमदार काशीराम पावरा,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, तहसीलदार महेंद्र माळी यांच्या वाहनासह पोलीसांच्या वाहनांवर जमावाने दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली आहे.

घटनास्थळी पोलीसांकडून अश्रीधुरांचा वापर करण्यात आल्यानंतर गर्दी पांगवण्यात पोलीसांना मदत झाली होती. यानंतर उशिरापर्यंत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, सहायक निरीक्षक दीपक पावरा, जयेश खलाणे व सहकारी एस आर पी एफची एक तुकडी रात्रीपासून घटनास्थळी ठाण मांडून होते.

सकाळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पोलीस प्रशासनातर्फे सांगवी गावात रुट मार्च काढण्यात आला होता.संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला होता.

रात्री आमदार काशिराम पावरा शांततेचे आवाहन करण्यासाठी गेल्यानंतर भाजपचे आमदार काशीराम पावरा यांच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलघ यासोबतच महामार्ग पोलीसांचे वाहन व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वाहनाचे प्रचंड नुकसान करण्यात आले यात दोन खाजगी वाहनांची देखील तोडफोड कलण्यी आली .

पोलीसांनी ताब्यात घेतलेले संशयितांचे नावे पुढील प्रमाणे
1)नागेश ऊर्फ योगेश परशुराम तुंगार वय 25 वर्षे रा. सांगवी ता. शिरपुर जि.धुळे
2) प्रकाश दुरशा पावरा वय 37 वर्षे रा. जोयदा ता. शिरपुर जि. धुळे
3) 3) आकाश सतीलाल भिल वय 21 वर्षे रा. निमझरी ता. शिरपुर
4) 4) मच्छिद्र नारायण भिल वय 21 वर्षे रा.कळमसरे ता. शिरपुर जि.धुळे
5) 5) मच्छिद्र शिवाजी भिल वय 20 वर्षे रा. निमझरी ता. शिरपुर जि.धुळे 
6) दिपक उदयसिंग भिल वय 20 वर्षे रा.निमझरी ता.शिरपुर जि.धुळे
7) 7) समाधान राजेंद्र भिल वय 20 वर्षे रा.निमझरी ता. शिरपुर जि.धुळे
8) 8) इंदर अंबर भिल वय 20 वर्षे रा.कळमसरे ता. शिरपुर जि.धुळे
9) 9) अविनाश राजेंद्र भिल वय 20 वर्षे रा. हिगोणीपाडा ता. शिरपुर
10)  10) जितेंद्र राजेंद्र कोकणी वय 30 वर्षे रा.सांगवी ता. शिरपुर जि. धुळे

WhatsApp
Follow by Email
error: