बैल चोर पोलीसांच्या ताब्यात,चोरी झालेले दोन्ही बैल बघून मालक खूश

बातमी कट्टा:-  शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधील गुरांच्या बाजारातून बैलांची जोडी चोरी झाल्याची घटना दि 10 रोजी घडली होती.शिरपूर शहर पोलीसांकडून शोध सुरु असतांना धुळे येथे गुरांच्या बाजारात दोन्ही बैल विक्री करतांना शिरपूर शहर पोलीसांनी चार जणांना ताब्यात घेत दोन्ही बैल मालकांच्या ताब्यात दिले.ऐन पोळासणाच्या तोंडावर चोरी झालेले बैल परत मिळाल्याने बैल मालकाने आनंद व्यक्त केला.

बघा व्हिडीओ

याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात मुन्नीराम खुमसिंग पावरा वय 46 रा.ढाबापाडा ता.शिरपूर यांनी फिर्याद दिली आहे.मुन्नीराम पावरा हे बैल खरेदी विक्री करतात.चार महिन्यांपूर्वी त्यांनी दोन पांढऱ्या रंगाचे बैल विकत घेतले होते.महिन्याभरापूर्वी त्यातील एक बैल त्यांनी शिरपूर गुरांच्या बाजारात विक्री साठी आणला होता.मात्र भाव भेटत नसल्याने तिथेच बैल बांधून ठेवत होते.10-15 दिवसांनी पुन्हा दुसार बैल त्यांनी गुरांच्या बाजारात विक्रीसाठी आणला.मात्र बैलजोडीला योग्य भाव भेटत नसल्याने बैलजोडी बांधून मुन्नीराम घरी गेले.

बघा व्हिडीओ

दि 9 रोजी दुपारी 12:30 परत आल्यानंतर बैलजोडीला जागेवर चारापाणी केली आणि पुन्हा घरी निघून गेले.दि 10 रोजी सकाळी 7 वाजता त्यांना जागेवर बैलजोडी नसल्याचा फोन आला.मुन्नीराम मित्रांसोबत शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुरांच्या बाजारात गेले असता त्यांना त्यांचे दोन्ही बैल मिळुन आले नाही.संपूर्ण शोध घेऊन देखील बैल मिळाला नसल्याने मुन्नीराम पावरा यांनी 60 हजार किंमतीचे दोन्ही बैल चोरी झाल्याचे फिर्याद दिली.यानंतर पोलीस निरीक्षक आन्सासाम आगरकर यांना गोपणीय माहिती मिळाली होती.

त्या माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने धुळे येथील गुरांच्या बाजारात चोरी झालेल्या बैलांची विक्री करतांंना आरीफ मजीद तेली व त्याचा साथीदार रितीक रतन शिरसाठ यांना पोलीसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता आरीफ मजीद तेली,सनी धुडकु सोनवणे,किरण गोपाल सोनवणे,रितीक रतन शिरसाठ सर्व रा.शिरपूर यांना पोलीसांनी ताब्यात घेत दोन्ही बैल मालक मुन्नीराम पावरा यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,पोलीस निरीक्षक आन्सासाम आगरकर, शोध पथकाचे ललीत पाटील, रविंद्र आखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे,प्रशांत पवार,मनोज दाभाडे,भटु साळुंके,सचिन वाघ,आरीफ तडवी,मनोज महाजन आदींनी केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: