
बातमी कट्टा:- दिनांक 12 सप्टेंबर रोजी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.चंदनसिंग डोंगरसिंग राजपुत (चंदनआबा) यांच्या पुतळ्यास अभिवादन करत डॉ जितेंद्र ठाकूर प्रतिष्ठान तर्फे शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला .
रुग्णांसाठी डॉक्टर देवदुतच असतात त्याच अनुषंगाने
सर्व प्रथम उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अमोल जैन यांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला त्यासोबत अहोरात्र रुग्णसेवा करणारे सहकारी डॉक्टर रुग्णालयातील नर्स,आरोग्य सेवक,कर्मचारी,वार्ड बॉय,ॲम्बुलन्स ड्रायव्हर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे शहरातील व तालुक्यातील स्वाभिमानी समाजसेवकांनी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करत धीर दिला. यावेळी अरविंद राजपूत, बन्सीलाल गुजर, धीरज राजपूत, मुन्ना पाटील, हिरा वाकडे, राकेश चौधरी, सुधीर चव्हाण, गजेंद्र राजपूत, वासुदेव राजपूत, मोहन मंडले, नितीन राजपूत, डॅनी चांदे, किशोर राजपूत, प्रशांत पाटील,आशिष ठाकूर, श्याम पाटील,दिपक कोळी,नाना कोळी, प्रताप कोळी,भैय्या कोळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुठलाही गाजावाजा न करता डॉ.जितेंद्र ठाकूर साहेबांना आवडणारी रुग्ण सेवा करत डॉ.जितेंद्र ठाकूर प्रतिष्ठान तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला.