
बातमी कट्टा:- शेतीच्या हिस्सेवाटणीवरू खून झाल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे. हिस्सेवाटणीच्या रागातून भाऊ आणि दोन पुतणे यांनी जिवघेणा हल्ला केला होता. रक्तबंबाळ अवस्थेत धुळे येथे उपचार सुरु असतांना रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथे गट क्रमांक १६० या शेतीच्या हिस्सेवाटणीवरून खून झाल्याची घटना घडली आहे.प्राणघातक हल्ला बाबत थाळनेर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यात फिर्यादीत म्हटले की,जैतपूर येथील विजयसिंह राजपूत यांची जैतपूर गावाच्या शिवारात वडिलोपार्जित शेती आहे. या शेतीच्या वाटे हिस्स्यावरून विजयसिंग यांचे भाऊ देवनाथसिंग राजपूत,व पुतणे अमोल राजेसिंग राजपूत व प्रदीप राजेसिंग राजपूत यांच्यात वाद होते. दि. १४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास विजयसिंग राजपूत हे मुलगा प्रशांत राजपूत व पृथ्वीराज राजपूत (५५) असे पोळा सणानिमित्त बैल घेण्यासाठी शेतात गेले होते. बैल घेऊन घरी येत असताना रस्त्यात देवनाथसिंग व अमोल आणि प्रदीप असे त्यांचे बैल सजवीत होते. यावेळी प्रदीप राजपूत याने शेतात दिसले तर तुमचा मुडदा पडेल अशी धमकी देत यानंतर शेतात पाय ठेवायचा नाही.त्यावर त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ केली होती. त्यानंतर दि.१५ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान शेताच्या वादातून देवनाथसिंग राजपूत , अमोल व प्रदीप या तिघांनी संगनमत करून विजयसिंह राजपूत यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या डोक्यात दगडाने व डोझरच्या पासावर डोके ठोकून गंभीर जखमी केले होते. विजयसिंह राजपूत यांना रक्तबंबाळ बेशुध्दावस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळ्यातील श्री सिध्देश्वर या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.याबाबत पोलीसांनी देवनाथसिंग राजपूत,अमोल राजेसिंग राजपूत व प्रदीप राजेसिंग राजपूत यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
दि 16 रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास विजयसिंह राजपूत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजयसिंग राजपूत यांना धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून थाळनेरचे सा.पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली आहे.याप्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे.