
बातमी कट्टा:- नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला जोडणारा सारंगखेडा पुलाला मोठे भगदाड पडले आहे.कालपासून तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने पुर परिस्थीती निर्माण झाली आहे असे पुलावर भगदाड पडले आहे तर रस्त्याला तडे देखील पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गेल्यावर्षी पुलाचे काम झाले असतांना पुलावर एवढा मोठा खड्डा पडला कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दोंडाईचा शहादा रस्त्यावरील सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुल हा ब्रिटीश कालीन पुल आहे.मात्र आज दोंडाईच्या बाजूने पुलाच्या बाजुचा भराव वाहून गेल्याने पुलावर भगदाड पडले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोडांईचा पोलीसांनी नंदुरबार चौफुली तर शहादा पोलीसांनी अनरद बारीजवळून वाहतूक वळवली
पुलावर भगदाडसह पुलावरील रस्त्याला तडे देखील पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गेल्याच वर्षी पुल बंद करुन राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाची दुरुस्ती केली होती.असे असतांना भराव वाहून भगदाड पडल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.