एकुलत्या मुलाची तापीत आत्महत्या

बातमी कट्टा:- महाविद्यालयीन विद्यार्थी व घरातील एकुलत्या मुलाने गिधाडे तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि 17 ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास घडली आहे.किरण पदमसिंग राजपूत वय 19 मृताचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील लंगाणे येथील किरण पदमसिंग राजपूत या 19 वर्षीय तरुणाने तापी नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.दि 17 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिरपूर शिंदखेडा रस्त्यावरील गिधाडे तापी नदी पुलावर हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल उभी होती.यावरुन तापी नदीत मोटरसायकल चालकने उडी घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.घटनास्थळी उपस्थितांनी तात्काळ मच्छीमारांना सांगून शोध कार्य सुरु केले.यादरम्यान मोटरसायकल क्रमांकावरून शिंदखेडा तालुक्यातील लंगाणे येथील किरण पदमसिंग राजपूत या 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड झाले.सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात त्याचा किरण राजपूत याचा मृतदेह आढळून आला.मयत किरण राजपूत हा दादासाहेब रावल कॉलेज दोंडाईचा येथे बिसीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.तो घरातील एकुलता एक होता तर त्याच्या पश्चात दोन बहिण आणि आई वडील असा परिवार होत त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

WhatsApp
Follow by Email
error: