
बातमी कट्टा:- स्वतःच्या शेतात गळफास घेऊन ४४ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना दि १८ रोजी घडली आहे.त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. लोटन उत्तमसिंग गिरासे अस मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील खर्दे ता. शिंदखेडा गावातील लोटन उत्तमसिंग गिरासे वय ४४ या शेतकरीने स्वताच्या शेतातील पत्राच्या खोलीत लोखंडी पाईपला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.१८ रोजी घडली.
घटनेची माहिती भाऊ संजय उत्तमसिंग गिरासे यांना कळताच शेतात घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता लोटन गिरासे हे गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आले. गावकऱ्यांच्या मदतीने खाली उतरून लोटन गिरासे यांना खाजगी वाहनाने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे उचरासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस जैन यांनी तपासून शेतकरी लोटन गिरासे यांना मृत घोषित केले.आत्महत्येचे कारण मात्र कळु शकलेले नाही.