श्रीक्षेत्र टेंभे येथे विविध विकास कामांचे उदघाटन

बातमी कट्टा:- श्रीक्षेत्र टेंभे येथे श्री गुरु नथुसिंग बाबा आळंदीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, वनावल गटाच्या जिल्हा परिषद सदस्या अभिलाषा पाटील, माजी.पंचायत समिती उपसभापती जगत बापू, माजी पंचायत समिती सदस्य भरत भिलाजी पाटील या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सप्ताहाचे पूजन करण्यात आले. 

कार्यक्रमानिमित्त मान्यवरांच्या हस्ते गावाला दिलेल्या विविध विकास कामांची उद्घाटन यावेळी करण्यात आली. आमदार काशीराम पावरा व जि. प. सदस्या अभिलाषा पाटील यांच्या निधीतून मंदिरासाठी असलेल्या सभा मंडपात फरशी बसवणे, मंदिर परिसरात वॉटर फिल्टर बसविणे, फेवर ब्लॉक बसविणे, गावाच्या दर्शनी ठिकाणी नथुसिंग बाबा यांच्या नावाच्या गाव दरवाजा व कमान, जि. प. शाळेच्या कामासाठी निधी, टेंभे ते रुदावली शिवरस्ता आधी विकास कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

 या विकास कामांना आमदार अमरीशभाई पटेल, शिरपूर नगरपालिकेचे मा. उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर शहराचे मा. नगरसेवक अशोक कलाल, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

कार्यक्रमासाठी गावातील संजयसिंग महाराज राजपूत अध्यक्ष विठ्ठल मंदिर टेंभे बु.,कन्हैया महाराज राजपूत अध्यक्ष विठ्ठल मंदिर चांगदेव, सरपंच दिलकोरबाई देवेसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्या रेखाबाई पुंडलिक राजपूत, देवेसिंग मंगलसिंग राजपूत, उपसरपंच जयसिंग भगवानसिंग राजपूत, निंबा मोहनसिंग राजपूत,देवेंद्र भारतसिंग राजपूत, रवींद्र बुधा कोळी, भुरा कढरे, संदीप देविदास भिल, दयाराम लोटन कोळी, सुनंदाबाई राजेंद्र भिल व गावातील ग्रामस्थ,तरुण माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 विकास कामांना निधी मंजूर करून दिल्याबद्दल गावातील ग्रामस्थांनी आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशीराम पावरा व वनावल गटाच्या जि. प. सदस्या अभिलाषा पाटील व भरत पाटील यांचे आभार मानले.

WhatsApp
Follow by Email
error: