
बातमी कट्टा:- शिरपूर येथील यशवंत नागरी पतपेढीच्या कर्मचाऱ्याने वीज कनेक्शनच्या डिमांड नोटचा भरणा न करता त्यावर डल्ला मारल्याचा आरोपावरून संतप्त ग्राहकाने कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर चोप दिल्याची घटना आज दि 23 रोजी घडली.
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील हेमंत चौधरी यांनी केलेल्या आरोपानुसार हेमंत चौधरी यांचे मांडळ शिवारात घर बांधण्यासाठी महावितरणकडे वीज मीटर साठी ऑनलाईन अर्ज केला होता.यासाठी दि २५/९/२३रोजी शिरपूर शहरातील यशवंत नागरी पतपेढीत अधिकृत विज बिल भरणा केंद्रावर हेमंत चौधरींनी मुलाला पाठवून तिन हजार १५९ रुपयाची डिमांड नोट भरली होती. परंतु पतपेढीच्या कर्मचाऱ्याने विद्यार्थी बघून भरणा पावती दिली नाही. सदर भरणा ऑनलाईन झाला असून लवकरच तुम्हाला मीटर मिळेल असे सांगितले व घरी पाठवले. डिमांड साठी भरणा करुन २०ते २५ दिवस झाल्यानंतर देखील नवीन विज मीटर न आल्याने हेमंत चौधरी यांनी महवितरणच्या करवंद कार्यालयाला विचारणा केली.
त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की आपण ऑनलाइन डीमाड नोट भरलेली नाही. हेमंत चौधरी यांनी मुलास पतपेढीत पुन्हा पाठवून पावती मागायला सांगितली. यावेळी विद्यार्थ्यास बघून संदीप धाकड नामक कर्मचाऱ्याने उडवा उडवीचे दिली. यावेळी मुलाने त्याच्या वडिलांशी मोबाईलवर संपर्क करून दिल्यानंतर कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने घाबरून आजचा ऑनलाइन भरणा करून पावती दिली. पतपेढीत नागरिक दुपारी आल्यानंतर कर्मचाऱ्यास जाब विचारल्यानंतर त्याने उडवा उडवी ची उत्तर देत माझं कोणीच काही वाकड करू शकत नाही अशी भाषा वापरल्याने संतप्त ग्राहकाने पतपेढी बाहेर कर्मचाऱ्यास चोप दिल्याचा आरोप ग्राहक हेमंत पाटील यांनी केला.यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पतपेढीचे चेअरमन किरण दलाल यांनी मध्यस्थी करत पोलिसात तक्रार न करण्याची विनंती केल्याने प्रकरण मिटले.