बक्षीस म्हणून दोन हजारांची लाच स्विकारतांना मंडळाधिकारी धुळे एसीबीच्या ताब्यात…

बातमी कट्टा:- शेतजमीनीची वाटणी करून दिल्याने दोन हजारांची लाच बक्षीस म्हणून स्विकारतांना मंडळाधिकारीला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतल्याची घटना आज दि 2 रोजी घडली आहे.

तकारदार यांच्या वडीलांच्या नावे मौजे वारूळ, ता. शिरपूर जि.धुळे येथे गट नं. १७५ / १२ / ०१ व गट नं. १७५ / १२ / ०२ अशी शेत जमीन असुन सदरची शेत जमीन तक्रारदार व त्यांची बहीन यांच्यात वाटणी करून देणे बाबत शिरपूर येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिल्याने तक्रारदार यांनी मा. न्यायालयाच्या आदशाची प्रत जोडुन तहसिलदार, शिरपूर यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाने शेत जमीन नावे करून देणे बाबत दि. ३०.०८.२०२३ रोजी अर्ज जमा केला होता. त्यावरून मा. तहसिलदार, शिरपूर यांनी सदरचा अर्ज पुढील कार्यवाही करीता दि.१२.०९.२०२३ रोजी तलाठी वरूळ यांच्याकडे पाठविला होता. त्याप्रमाणे तलाठी व मंडळअधिकारी यांनी तक्रारदार यांचे अर्जावर कार्यवाही करून शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर नावे लावण्याचे काम करून दिले होते.

त्यानंतर मुकेश श्रीकांत भावसार, मंडळ अधिकारी भाग जवखेडा यांनी तकारदार यांना मोबाईलवर फोन करून त्याचे शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर नावे लावण्याचे काम करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणुन त्यांच्याकडे २,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तकारदार यांनी दुरध्वनी वरून माहीती दिली होती.

सदर माहीती वरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिरपूर येथे जावुन तक्रारदार यांची भेट घेवुन त्यांची तकार नोंदवुन सदर तकारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता मुकेश भावसार, मंडळ अधिकारी भाग जवखेडा यांनी तक्रारदार यांचेकडे २,०००/-रु पंचासमक्ष लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम लागलीच स्विकारल्याने त्यांना आज दि.०२.११.२०२३ रोजी शिरपूर येथून ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक हेमंत बेडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

WhatsApp
Follow by Email
error: