
बातमी कट्टा:- गावातील गटारीच्या जिवघेना खड्ड्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वनावल गावातील ग्रामस्थांनी केला आहे.या खड्डयामुळे अनेकांचा अपघात होऊन दुखापती होत असतांना ग्रामपंचायत प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.
शिरपूर तालुक्यातील वनावल येथे दोन महिन्यापासून गावाच्या मध्यभागी सार्वजनिक गटारीचा दुरुस्तीसाठी खड्डा खोदकाम करुन ठेवले आहे. दोन महिन्यापासून ग्रामस्थ दिवाळीच्या सणासुदीच्या काळात त्रस्त असून वारंवार ग्रामसेवक सरपंच व ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करून सुद्धा कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसून ग्रामसेवककडे तक्रार केल्याने ग्रामसेवक देखील उडवा उडवीचे उत्तरे असतात नागरिकांना शेतीमाल आणण्यासाठी व वाहतुकीला देखील नाहक त्रास होत आहे.झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
