
बातमी कट्टा:-साक्री येथे दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या तरुणीला मध्यप्रदेश राज्यातील शेंधवा येथून पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.सदर तरुणी शेंधवा पोलीसांच्या ताब्यात असल्याचे समजल्यांनतर तात्काळ रात्रीत शिरपूर तालुका पोलीस शेंधवा येथे दाखल झाले होते.रात्री उशिरा धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची विचारणा करत असतांना सदर तरुणीला शेंधवा पोलीसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार साक्री शहरातील विमलबाई कॉलेज मागे असलेल्या परिसरात एका घरावर रात्री पाच ते सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी घरातील सदस्यांना चाकू तसेच गावठी पिस्तूलचा धाक दाखवत दरोडेखरांनी मारहाण केली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह यावेळी दरोडेखोरांनी आपल्या आत्याकडे आलेल्या 23 वर्षीय तरुणीला देखील सोबत उचलून नेले.या घटनेमुळे साक्री शहरासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती.दरोडेखोरांनी तरुणीचे अपहरण केल्याची गंभीर घटना घडल्यानंतर साक्री शहर पोलीसांसह धुळे जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर आली.पोलीसांकडून सर्वत्र कसून शोध सुरु असतांना दि 26 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शेंधवा पोलीसांना तरुणी मिळुन आली यानंतर शेंधवा पोलीसांनी धुळे पोलीसांशी संपर्क साधत माहिती दिली रात्रीच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक खलाणे व त्यांच्यासह पथक शेंधवा येथे रवाना झाले व त्या तरुणीला ताब्यात घेतले.सदर तरुणी शेंधवा येथज रात्री उशीळा धुळ्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची विचारपूस करत असतांना शेंधवा पोलीसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा असून तरुणीच्या जबाबातून दरोडा व अपहरणाची आपबित्ती उघड होणार आहे.