गोडाऊन मध्ये सुरु होता बनावट युरीया डिईएएफ रसायनचा कारखाना

On YouTube

बातमी कट्टा:- गोडाऊन मध्ये सुरु असलेल्या बनावट युरीया डिईएफ रसायनच्या कारखान्यावर मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकून पोलीसांनी कारवाई करत सुमारे 53 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी बनावट युरीया डिईएफ कारखान्यावरची केलेली कारवाई ही महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठी व पहिली कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे.

बघा व्हिडीओ

दि.३० रोजी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती त्या बातमी नुसार पळासनेर ता. शिरपुर जि. धुळे जवळील हेंद्रापाडा येथे एका बंद गोडाऊन मध्ये जयपाल प्रकाश गिरासे रा. शिरपुर  हा टाटा डेफ, गल्फ अँड ब्लू व महेंद्रा मॅक्सीमाई प्लस या कंपन्यांचे बी. एस.६ इंजिनच्या कार व अवजड वाहनांमध्ये वापरले जाणारे युरीया डेफ चे बनावटी करण करुन त्याची मार्केट मध्ये विक्री करीत असल्याबाबत समजल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी इ.आय.पी.आर. (इंडीया) प्रा. लि. कंपनीचे अधिकारी यांना सदर घटनेची हकिगत कळवुन त्यांचा स्टाप छापा कार्यवाही कामी आल्याने पोलीस अधीक्षक, धुळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे शिरपूर यांना आय.पी. आर. (इंडीया) प्रा. लि. कंपनी चे अधिकारी यांचे सोबत छापा घालणे कामी आदेशीत केल्याने सचिन हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी शिरपुर तालुका पो. स्टेशनचे सपोनि जयेश खलाणे व शिरपुर शहर पो.स्टे चे पोसई- गणेश कुटे व पोलीस पथक यांना बातमीची हकिगत कळवुन सदर ठिकाणी रेड कार्यवाही करणे कामी हजर राहणे बाबत आदेशीत केल्याने वर नमुद स्टाफ सह पळासनेर गावाजवळील हेंद्रापाडा परिसरात जावुन मिळालेल्या बातमीची खात्री करुन दि.३० रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे युरिया डेफ रसायन तयारण्यासाठी लागणारे मशीन, प्लॉस्टीक बकेट, युरीया कच्चा माल, रसायन, होलोग्राम, प्लॉस्टीक टाक्या व दोन महेंद्रा पिकअप वाहन असा ५३ लाख २५,हजार ९५०/- रुपये किंमतीचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे.

On YouTube

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सपोनि जयेश खलाणे, पोसई सुनिल वसावे पोसई गणेश कुटे, पोहेकॉ खसावद, पोना राजु ढिसले, पोना संदिप ठाकरे, पोकॉ योगेश मोरे, पोकॉ गायकवाड पोकॉ  विनोद अखडमल, पोकॉ प्रशांत पवार, पोकॉ भटु साळुंखे, पोकॉ ईश्वर आसापुरे, पोकॉ गुरुदास बडगुजर यांनी केली असुन सदर गुन्ह्याबाबत इ.आय.पी. आर. (इंडीया) प्रा. लि. कंपनी चे अधिकारी सागर अशोक आबनावे यांनी संशयित नामे (१) जयपाल प्रकाश गिरासे (राजपुत) रा. पळासनेर ता. शिरपुर जि. धुळे ह.मु. शिरपुर ता. शिरपुर जि.धुळे (२) छन्ना राणा पावरा वय ३५ वर्षे व्यवसाय- ड्रायव्हर, रा. हाडाखेड ता. शिरपुर जि. धुळे (३) सुरलाल काहच्या पावरा वय २४ वर्षे, व्यवसाय- ड्रायव्हर रा. नटवाडे ता. शिरपुर जि. धुळे यांच्या विरुध्द इ. आय.पी. आर. (इंडिया) प्रा. लि. कंपनि तर्फे कॉपीराईट कायदा सन १९५७ चे कलम ५१,६३ सह भांदवी कलम ४२०,४८३,४६८ सह व्यापार चिन्ह अधि. १९९९ चे कलम १०३,१०४(अ) प्रमाणे तक्रार दिली असुन सदर गुह्याचा पुढील तपास सपोनी जयेश खलाणे हे करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: