मनोज जरांगे पाटीलांची उद्या धुळ्यात जाहीर सभा…

बातमी कट्टा:- मनोज जरांगे पाटील यांची उद्या दि 3 डिसेंबर रोजी धुळे येथे जाहीर सभा होणार असून या सभेसाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील पन्नास हजारापेक्षा अधिक मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी जनजागृती करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या धुळ्याच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.दि 3 डिसेंबर रोजी मनोज जारंगे पाटील यांचे धुळे शहरातील जेलरोड परिसरामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेसाठी धुळे जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव एकत्र येणार आहेत.

सभेसाठी पोलीसांकडून मोठा फौज फाटा तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या सभेच्या वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नऊ पोलीस निरीक्षक, 24 उपनिरीक्षक अथवा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 400 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला राहणार असून चार आर सी पिच्या तुकाड्या तैनात राहणार आहेत.

शहरात सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी होणार नाही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासनाकडून दक्षता घेतली जाणार आहे. तर शहरातील विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियंत्रण केल जाणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: