
बातमी कट्टा:- श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. राजस्थान येथील जयपूर येथे घटना घडली असून संशयित घटनास्थळावरून पसार झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार भरदुपारी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून यात सुखदेवसिंह गोगामेडी यांचे सुरक्षारक्षक जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
राजस्थान राज्यातील जयपूर येथे घरात घुसून सुखदेवसिंह गोगामेडी यांच्यावर चार गोळया घालून हत्या करण्यात आली आहे.त्यांच्या समवेत चार जणांना गोळी लागली असून रुग्णालयात उपचारादरम्यान सुखदेवसिंह गोगामेडी यांचा मृत्यू झाला आहे.पोलिसांकडून संपूर्ण जयपूर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे.