
बातमी कट्टा:- वृध्द शेतकरी शेतातील खळ्यात झोपलेले असतांना चार संशयितांनी कापूस चोरण्यासाठी खळ्यात शिरून शेतकऱ्याच्या हातापायावर बसून चिलाना मत काट डालूगा म्हणत जिवे मारण्याची धमकी देत ५ ते ६ क्विंटल कापूस चोरी केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील शेतकरी सुभाष हरी बडगुजर हे वृद्ध शेतकरी नहमी प्रमाणे दि 24 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अर्थे गावाच्या पुढे शहादा रस्त्यावर शेतात असलेल्या खळयात जाऊन झोपले.या खळ्यात त्यांनी कापूस भरून ठेवला होता.दि 25 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास शेतकरी सुभाष बडगुजर झोपलेले असतांना चार संशयित तोंडावर रुमाल बांधून खळ्यात शिरले त्यातील दोन संशयितांनी शेतकरी सुभाष बडगुजर यांच्या एकाने हात पकडला आणि दुसऱ्या संशयिताने पायावर बसून चिल्लाना मत काट डालूगा अशी जिवे ठार मारण्याची धमकी देत पाच ते सहा क्विंटल कापूस चोरी केला. शेतकरी सुभाष बडगुजर यांनी आरडाओरड केल्याने त्यांच्या रखवालदार यांनी धाव घेतली मात्र तेथून संशयित पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्यासह शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.