उंटांची तस्करी होत असल्याच्या संशयाने शिरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे

व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक वर क्लिक करा
https://www.facebook.com/share/v/pDKmRkKE3HP55Lyk/?mibextid=zLoPMf

बातमी कट्टा:-गुजरात राज्यातून विदर्भाकडे उंटांना घेऊन जाणाऱ्या दोन जणांना शिरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेत 49 उंटांना वरूळ येथील संत तुकाराम महाराज पंजरापोळमध्ये पाठविण्यात आले आहेत.शिरपूर तालुक्यातील विखरण गावाजवळील शिरपूर-शहदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.तस्करीच्या उद्देशाने उंट घेऊन जात असावेत असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा..
https://www.facebook.com/share/v/pDKmRkKE3HP55Lyk/?mibextid=zLoPMf

मोठ्या प्रमाणात उंट हे गुजरात राज्यातील कच्छभुज येथून महाराष्ट्रातील विदर्भ येथे उंट पायी जात असल्याची माहिती शिरपूर शहर पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना मिळाली होती.या माहिती नुसार शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह पथक शिरपूर तालुक्यातील शहादा शिरपूर रस्त्यावरील विखरण गावाजवळ गेले असता तेथे 49 उंट पोलिसांना आढळून आली.

पोलिसांनी उंटांसोबत असलेल्या दोन व्यक्तींना विचारपुस केली असता.सदर उंट गुजरात येथील कच्छबुज येथून महाराष्ट्र राज्यातील गोंदिया येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या प्रमाणात उंट कुठे व का ? घेऊन जात आहेत हे कोणाला विकले जाणार होते का असे असंख्य संशास्पद प्रश्न यावेळी त्यांना उपस्थित होत होती.या उंटांची तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांना असल्याने पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.चोपडा आणि मालेगाव या परिसरात देखील पोलिसांनी उंटांवर कारवाई केली होती.

व्हिडीओ बघण्यासाठी फेसबुक लिंक वर क्लिक करा
http://📸 Watch this video on Facebook
https://www.facebook.com/share/v/pDKmRkKE3HP55Lyk/?mibextid=zLoPMf

WhatsApp
Follow by Email
error: