धुळे जिल्ह्यातील सात बोगस डॉक्टरांवर कारवाई

बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ७ मुन्नाभाई डॉक्टरांवर संयुक्त कारवाई केली आहे. यात साक्री तालुक्यातील तीन धुत्रे तालुक्यातील एक आणि शिरपूर तालुक्यातील दोन अशा सात बोगस डॉक्टरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कुठलाही परवाना नसतांना अलोपॅथी औषधसाठा बाळगून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचेकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील डॉ. हितेंद्र गायकवाड यांना याविषयी अवगत करून पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना कायदेशिर कारवाई करण्याचे निर्देश दिले. 

त्यानुसार दि.४ जानेवारी २०२४ रोजी डॉ. हितेंद्र गायकवाड, यांचेसह वैद्यकीय विभागाचे व पोलीस दलाचे संयुक्त पथकाने धुळे जिल्ह्यातीलस साक्री तालुक्यातील पिंपळनेर, शिरपूर तालुक्यातील भामपुर व बोराडी तसेच धुळे तालुक्यातील सोनगीर या गावात छापा टाकला. या कारवाईत अलोपॅथी औषधी साठा, इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या आढळून आल्या.

या कारवाईत साक्री तालुक्यातील असि तबसुम बिश्वास रा. वार्सा, ता. साक्री, उमरे गावातील संभाजी माधवराव सोनवणे,  योगेश चंद्रकांत पाटील व राकेश प्रकाश पाटील दोघे रा. गोपालनगर, महावीर भवन जवळ, पिंपळनेर, विजयसिंग धुडकू बडगुजर बोराडी ता.शिरपूर, धियज रोहिदास अहिरे रा.भामपुर ता.शिरपूर, समर विजय बिस्वास (४७) रा. अकोला,पो. अमळा कशिपूर, ता.हाबडा, जि. नारथे,प्रगोना पश्चिम बंगाल ह.मु.सोनगीर या सात बोगस डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: