
बातमी कट्टा:- भीषण अपघातात दोन वनमजूरांचा मृत्यू झाल्याची घटना आज दि 23 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मोटरसायकलीने प्रवास करत असतांना समोरील वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बोराडी- सांगवी रस्त्यावरील होऱ्यापाणी फाट्याजवळ रस्त्याच्या वळणावर बोराडीकडून देविदास भटा पाटील वय ५४ रा.हिसाळे व कैलास राघो कोळी वय ४५ रा. हिसाळे दोन्ही मोटारसायकलीने सांगवीकडे जात असतांना समोरुन येणाऱ्या वाहनाचा आणि मोटरसायकलीचा समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला.या अपघातात देविदास भटा पाटील वय ५४ रा.हिसाळे व कैलास राघो कोळी या दोघांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल करण्यात आले.यावेळी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.मयत देवीदास भटा पाटील यांच्या पश्चात मुलगी,मुलगा, पत्नी, आई,भाऊ तर मयत कैलास राघु कोळी यांच्या पश्चात दोन मुले,पत्नी,आई असा परिवार होत.देवीदास पाटील आणि कैलास कोळी दोन्ही वनमजूर म्हणून कार्यरत होते.