
बातमी कट्टा:- तलवार आणि लोखंडी रॉडने तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांची शिरपूर शहर पोलिसांनी धिंड काढून संशयितांची चांगलीच जिवरली.हल्ला करतांना सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दहशत निर्माण झाली होती मात्र घटना घडली त्या परिसरात पोलिसांची संशयितांची वरात काढली.
बघा फेसबुकवरील व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/whwjZmiKRKN8R6zY/?mibextid=qi2Omg
शिरपूर येथील सुरज जाधव या २५ वर्षीय तरुणाचे शहरातील महात्मा फुले मार्केट समोर चहाची दुकान आहे.सुरज जाधव पेट्रोल भरण्यासाठी गेला असता काही मुलांनी त्याचा पाठलाग केला आणि मार्केट पर्यंत संशयितांनी तरुणाचा पाठलाग करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.संशयितांपैकी एका संशयिताच्या हातात तलवार तर दुसऱ्याकडे लोखंडी रॉड असून तलवार आणि लोखंडी रॉडने वार केल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत होते.
बघा फेसबुकवरील व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/whwjZmiKRKN8R6zY/?mibextid=qi2Omg
या भयंकर प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता.यादरम्यान पोलिसांनी हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला असतांना गोवींद कोळी या पोलिस कर्मचाऱ्याला देखील हाताच्या दोन बोफटांवर गंभीर दुखापत झाली.या घटनेमुळे संपूर्ण शिरपूर शहरासह तालुक्यात दहशत निर्माण झाली होती.
बघा फेसबुकवरील व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/whwjZmiKRKN8R6zY/?mibextid=qi2Omg
गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणात पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले यात एक विधीसंघर्ष बालक होता. आज शिरपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील व त्यांच्या पथकाने विधीसंघर्ष बालक वगळता इतर संशयितांची शिरपूरच्या मार्केट परिसरात धिंड काढली.संशयित राहत असलेल्या गावांमध्ये देखील धिंड काढण्यात आली. नशा करून तलवार आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून संपूर्ण शहरासह तालुक्यात दहशत माजवणार्या या संशयितांची धिंड काढल्यानंतर जनतेतून मात्र समाधान व्यक्त करण्यात आले.
https://www.facebook.com/share/v/whwjZmiKRKN8R6zY/?mibextid=qi2Omg