
बातमी कट्टा:- जातोडे बाळदे परिसरात अवैध वाळू वाहतूकीने अक्षरशः हैदोस घातला असून यामुळे शिरपूर बाळदे रस्त्याने वाहतूक करणाऱ्यांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.अवैध वाळू वाहतूकीकडे महसूल विभाग कानाडोळा करत असून पुन्हा अवैध वाळू वाहतूकीमुळे या परिसरात जिव जाण्याची वाट बघत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिरपूर तालुक्यातील जातोडे परिसरात अवैध वाळू वाहतूकीमुळे मोठा अपघात घडला होता यात महिलेला आपला जिव गमवावा लागला होता.यानंतर या परिसरात अवैध वाळू वाहतूक बंद झाली होती.मात्र पुन्हा या परिसरात भरदिवसा अवैध वाळू वाहतूकीने हैदोस घातला आहे.अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे भरधाव ट्रॅक्टरांमुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय तर दुसरीकडे या वाळू वाहतूकीमुळे रस्त्यावर वाळू पडल्याने नाहक अपघातांना निमंत्रण दिले जात आहे.
रात्रंदिवस या परिसरातून अवैध वाहतूक होत असतांना मात्र महसूल विभाग झोपेच सोंग करतांना दिसत आहे. महसूल विभाला येथील वाळू वाहतूक का दिसत नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.याबाबत तक्रार केली तर फक्त तात्पुरती परिसरात महसूल विभागाकडून वाहनात बसून फेरी मारून पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते.या अवैध वाळु वाहतूकीला नेमका कोणाचा आशिर्वाद आहे ? असा प्रश्न परिसरात उपस्थित होत आहे.