गुन्हा घडला,ते फरार झाले अन् तीन महिन्यानंतर शिरपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले…

बातमी कट्टा:- गुन्हा दाखल झाल्यापासून ते चारही जण फरार होते.त्यातील दोन जण धुळे तर एक नाशिक आणि एक शिरपूर होता.अखेर पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यानंतर या फरार चारही संशयितांच्या शिरपूर शहर पोलिस स्टेशनच्या शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत.

बघा व्हिडीओ बातमी लिंक क्लिक करा https://youtu.be/p30IjwqHkKk?si=dY9Q_pGLM_YBRCM0

शिरपूर शहरातील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालय बाहेर दि ६ नोव्हेंबर रोजी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत झालेल्या भांडणात हाणामारीची घटना घडली या प्रकणी विशाल भिमराव शिरसाठ यांनी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात सनी धुडकु सोनवणे,रवींद्र ऊर्फ रवी आधार सोनवणे,भरत नाना सोनवणे,व ऋषीकेश धुडकू सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/p30IjwqHkKk?si=dY9Q_pGLM_YBRCM0

गुन्हा दाखल झाल्यानंतर चारही संशयित फरार झाले.गुन्हा दाखल झाल्याच्या तीन महिन्यानंतर रवी सोनवणे हा नाशिक येथे तसेच सनी सोनवणे व ऋषीकेश सोनवणे हे धुळ्यात व भरत सोनवणे धुळ्यात राहत असल्याबाबत माहिती मिळल्यानंतर पोलिस निरीक्षक के.के पाटील यांनी ओध पथकाला संशयितांना ताब्यात घेणे बाबत आलजशीत केले.

शोध पथकाने सनी धुडकु सोनवणे,रवींद्र ऊर्फ रवी आधार सोनवणे,भरत नाना सोनवणे,व ऋषीकेश धुडकू सोनवणे यांना ताब्यात घेत जेरबंद करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक के.के.पाटील,उपनिरीक्षक हेमंत खैरणार,शोध पथकाचे ललित पाटील, रविंद्र आखडमल,प्रशांत पवार,मनोज महाजन,योगेश दाभाडे, विनोद आखडमल,मनोज दाभाडे,आरीफ तडवी,भटु साळुंखे, सचिन वाघ,गोवींद कोळी तसेच होमगार्ड शयद पारधी,चेतन भावसार व राम भिल आदींनी केली आहे.

बघा व्हिडीओ वृत्तांत https://youtu.be/p30IjwqHkKk?si=dY9Q_pGLM_YBRCM0

WhatsApp
Follow by Email
error: