
बातमी कट्टा :- खासदार हिना गावीत यांना काळ्या फिती दाखवून भाटपुरा आणि होळनांथे परिसरात निषेध नोंदवला.भाटपुरा येथील युवासेना तर्फे यावेळी गंभीर आरोप करण्यात आले.ऐन निवडणूकीच्या तोंडावर खासदार गावित मतदार संघात फिरत असल्याचे यावेळी युवासेना पदाधिकारीने बोलून दाखवले आहे.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/ARsu8jtHAEesWUs9/?mibextid=qi2Omg
आज दि २७ रोजी खासदार हिना गावीत लोकसभा मतदार संघाच्या शिरपूर तालुका दौऱ्यावर असतांना तालुक्यातील भाटपुरा येथे खासदार हिना गावीत यांना ठाकरे गटाचे युवासेना उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड,सोमना मराठे सुनिल ठाकरे विशाल कोळी आदींनी काळ्या फिती दाखवून निषेध नोंदवला तर होळनांथे परिसरात ग्रामस्थांकडून काळ्या फिती दाखवण्यात आले.
भाटपुरा येथे युवासेना उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड यांनी व्हिडीओ द्वारे खासदार हिना गावीतांवर गंभीर आरोप केला आहे.
बघा फेसबुक व्हिडीओ https://www.facebook.com/share/v/ARsu8jtHAEesWUs9/?mibextid=qi2Omg