
बातमी कट्टा:-मागील भांडणाच्या रागातून तरुणाचा खून केल्याची घटना खळबळजनक घटना मध्यरात्रीच्या सुमारास धुळ्यात घडली आहे.याप्रकरणी मृत तरुणाच्या लहान भावाने पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आला आहे.धुळे शहर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे.
धुळे शहर पोलिस स्टेशनात ऋषिकेश छगन गुलदगडे, (२५) रा. प्लॉट नं.२० सहजीवन नगर, चक्करबर्डीरोड, धुळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार धुळयातील लक्ष्मीवाडीत राहणारा हर्षल मेंढे याच्यावर डिसेंबर २०१८ मध्ये भादंवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याने फिर्रादीला अडकविले होते. त्यावरून हर्षल मेंढे याला फिर्यादी ऋषीकेश गुलदगडेचा मोठा भाऊ अमोल गुलदगडे याने मारहाण केली होती. या मारहाणीचा राग मनात धरून काल रात्री १२.२० वाजेच्या सुमारास हर्षल मेंढे याने त्याचे साथीदार आदित्य मेंढे, राजू मेंढे, जयेश उर्फ गोलू थापटे व गुणवंत सोनवणे यांना सोबत घेवून अमोलला मारहाण करण्यास सुरवात केली. सहजीवन नगरातील नवनाथ मंदिराजवळ ते अमोलला जोरजोरात शिवीगाळ करुन मारहाण करीत होते. हा आवाज ऐकल्यानंतर फिर्यादी ऋषीकेश गुलदगडे काही जणांसह त्या ठिकाणी धाव घेतली असता सर्वजण अमोलला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करताना दिसले. यावेळी आदित्य मेंढे याने त्याचेकडील धारदार हत्याराने अमोलच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर हर्षल मेंढे हा अमोलच्या छातीवर बसून रुमालाने गळा आवळत होता.
तर राजू मंढे याने जिवे ठार मारण्याच्या इराद्याने अमोलला दगड मारला. परंतु, तो दगड पायाच्या अंगठ्यास लागुन दुखापत झाली. गुणवंत सोनवणे याच्या हातात देखील धारदार शस्त्र होते. तो हाताबुक्क्यांनी मारहाण करीत होता. जयेश उर्फ गोलु धापटे याने त्याच्या हातातील दांडक्याने अमोलला मारहाण केली दरम्यान,भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी ऋषीकेशने आदित्य मेंढे याला पकडले असता आकाश गावडे याने पकडून बाजुला केले.त्यानंतर पाचही जण घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर जखमी झालेल्या अमोलला मित्रांच्या मदतीने हिरे शासकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून अमोल गुलदगडे यास मृत घोषित केले असल्याचे ऋषीकेश गुलदगडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी हर्षल मेंढे, आदित्य मेंढे, राजू मेंढे, जयेश उर्फ गोलू थापटे व गुणवंत सोनवणे यांच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.