वॉटसअपवर “भुला देना मुझे ये अलविदा तुझे” या गाण्याचे स्टेटस, अन् तापीत आढळला मृतदेह…

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदी पात्रात तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.मयत तरुणाच्या वॉटसअपवर आशिकी २ या हिंदी चित्रटातील भुला देना मुझे ये अलविदा तुझे या गाण्याचे स्टेटस होते.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहराजवळील खर्दे गावातील सुनील मोहन पटेल यांचा आज दुपारी सावळदे तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आला.खर्दे येथील दत्तकृपा मेडिकलच काम ते सांभाळत होते. नेहमीप्रमाणे आज देखील मुलीला शाळेत सोडण्यासाठी सुनिल पटेल मोटरसायकलीने गेले.मात्र त्या नंतर त्यांच्याकडे असलेली मोटरसायकल सावळदे तापी पुलावर मिळून आली.

मोटरसायकल पुलावर मिळाल्याने सुनिल पटेल यांनी तापी नदीपात्रात आत्महत्या केल्याबाबत शंका उपस्थित झाल्याने घटनास्थळी नातेवाईक व गावकऱ्यांनी धाव घेत तापी नदीपात्रात शोध सुरु केला. ९:४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या वॉटसअप स्टेटसवर आशिकी २ या हिंदी चित्रपटातील भूला देणे ना मुझे हे अलविदा तुझे या गाण्याचे स्टेटस दिसत आहे. नदीपात्रात शोध सुरु असतांना सुनील पटेल यांचा सावळदे तापी पुलाखाली पाण्यात मृतदेह मिळून आला.तेथून मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.सुनील पटेल यांच्या पच्छात आई,वडील,पत्नी दोन मुली आणि भाऊ असा परिवार होत.आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती मिळु शकलेली नाही.

WhatsApp
Follow by Email
error: