धक्कादायक घटना, एकाची पोलीस कोठडीत आत्महत्या तर दुसऱ्याची कारागृहात गळफास

बातमी कट्टा:- चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयिताने पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.तर खूनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने देखील नाशिक कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील मारवड हद्दीतील डांगरी येथे बकरी चोरी प्रकरण व डांगरी करणखेडे शिवारातील तार चोरी प्रकरणात घनश्याम भाऊलाल कुमावत रा.डांगरी ता.अमळनेर यास मारवड पोलिसांनी अटक केली होती. त्याने शनिवारी सकाळच्या सुमारास पोलिस कोठडीतील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.बराच वेळ होऊन देखील शौचालयाच्या बाहेर आला नाही म्हणून गार्डने बघितले तेव्हा आत्महत्या केल्याचे उघड झाले.त्याचा मृतदेह इन कॅमेरा शवविच्छेदनासाठी धुळे पाठवण्यात आला.

तर दुसऱ्या घटनेत नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झालेल्या खूनाच्या घटनेत नाशिक कारागृहात अंडरट्रायल असलेल्या निफाड येथील सौरभ राजू ढगे वय २७ याने रूमालाने कारागृहात गळफास घेतली मात्र ही आत्महत्या नसून कारागृह कर्मचारींच्या मारहाणीत सौरभ ढगे याचा मृत्यू झाल्याची आरोप सौरभ ढगे याच्या कुटूंबीयांनी केला असून भाऊ लहान भाऊ मयूर ढगे याने नाशिक रोड पोलीस स्टेशनात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मयत सौरभ ढगे याचा मृतदेह धुळे येथे हिरे महाविद्यालय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले होते.

WhatsApp
Follow by Email
error: