धुळ्यात महिला न्याय हक्क परिषद ! काँग्रेस नेते राहुल गांधी काय बोलणार ?

बातमी कट्टा:-काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा भारत जोडो न्याय यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नंदुरबार येथून काल रात्री धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे राहुल गांधी यांचा मुक्काम होता. सकाळी ९ वाजता दोंडाईचा येथे रोड शो झाल्यानंतर धुळ्यात ते दाखल होणार आहेत. धुळ्यात महिला न्याय हक्क परिषदेला संबोधित करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी महिला न्याय हक्क परिषदेत काय सांगतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

दोंडाईचा शहरांमध्ये सकाळी ९ वाजेच्या सुमारास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा रोड शो झाल्यानंतर ते धुळ्यात दाखल होणार आहेत. धुळे येथील गांधी पुतळ्यापासून तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत त्यांचा रोड शो होणार आहे. 

यानंतर महिला न्याय हक्क परिषदेच्या ठिकाणी राहुल गांधी येणार आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांना नेमके कुठली आश्वासन देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पंचसूत्री कार्यक्रम जाहीर करीत आहे, त्याचाच एक भाग आजची महिला न्याय हक्क परिषद आहे.

WhatsApp
Follow by Email
error: