कैसे है आप दाजीसाहब ! गळाभेट करीत राहूल गांधीनी केली विचारपूस!थेट सोनिया गांधींशी साधला मोबाईलवरून संपर्क!

बातमी कट्टा:- भारत जोडो यात्रेनिमित्ताने काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे आज धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी पहिली भेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांची देवपूर धुळे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.गांधी परिवाराशी रोहीदास पाटील यांच्या परिवाराचे ऋणानुबंध यावेळी दिसून आले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना रोहीदास पाटील पाटील यांच्या प्रकृती बाबत माहिती मिळाल्यानंतर धुळे शहरात आल्यावर राहुल गांधी यांनी सगळ्यात पहिले माजी मंत्री रोहीदास पाटील यांची भेट घेण्यासाठी घरी पोहचले.कैसे है दाजी साहब! असं विचारीत थेट त्यांनी गळाभेट करीत आलिंगन दिले. यावेळी राहुल गांधी यांनी  रोहिदास पाटील यांच्या प्रकृतीची व वैद्यकीय उपचाराची माहिती घेतली. यावेळी रोहिदास पाटील यांच्या धर्मपत्नी सौ लताताई रोहिदास पाटील यांची राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून सोनिया गांधी यांनी रोहीदास दाजींच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार कुणाल पाटील ,अश्विनी कुणाल पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, डॉक्टर दिलीप पाटील उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: