
बातमी कट्टा:- जागतिक महिला दिनानिमित्त कर्मवीर व्यंकटराव रंधे सी बी एस सी स्कूल, शिरपूर येथे ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी यांच्याकडून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, प्रशासन, स्वयंपाकी, आदर्श माता या प्रकारातून महिलांची निवड करून त्यांचा सन्मान करण्यात आला. 8 मार्च हा जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना सन्मानित करून साजरा केला जातो. तसेच संस्थेचा महिला दिनाच्या निमित्ताने अधिकृत उद्घाटन आशाताई रंधे तसेच प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत करण्यात आले.
गेल्या 13 वर्षापासुन सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, प्रशासन, पर्यावरण क्षेत्रात सेवाभाव म्हणून काम करणारी तालुक्यातील कुरखळी येथील ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना शाल, सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती आशाताई रंधे, संगीताताई देवरे माजी नगराध्यक्ष, सावित्रीबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सारीकाताई रंधे, संगीता ताई देवरे शि. व. नगर पालिका, धुळे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालिका सिमाताई रंधे, प्रिन्सिपल नीलेश चोपडे, ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर मोरे, कार्याध्यक्ष मनोहर वाघ, उपाध्यक्ष दिलीप पाटील, सचिव नेहा मोरे, खजिनदार मुरलीधर मोरे, सदस्य वर्षा ताई पाटील, सदस्य दुर्गेश मोरे, यांच्या उपस्थितीत शिरपूर न्यायालयातील वकील शालिनीताई पाटील, आय ए एस अधिकारी भुवनेश्वर पाटील यांच्या आई सीमा पाटील मॅडम, यशदा च्या ट्रेनर व सामाजिक कार्यकर्त्यां नीता पाटील, मुख्याध्यापिका निशा देवरे, अर्थे च्या सरपंच पाटील, शि. व. नगरपालिका शिरपूर प्रशासनातील दिपाली पाटील, दामिनी पथकातील महिला पोलीस अनुराधा धाकड, क्रिडा शिक्षिका मयुरी भामरे, स्वयंपाकी म्हणून बोराडी येथे कार्यरत आशाताई वाघ, आशा सेविका ज्योतीबाई भिल, अंगणवाडी सेविका सीमा साळुंखे, यांचा शाल, पेन, सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी श्रीमती सुवर्णा पवार, प्रशिका निकम, जास्वंदी देवरे, नीता सोनवणे, समता बत्तीशे, शैला पाटील, मनीषा पाटील, निर्मला शिरसाट, सीमा पाटील, अनिता पाटील, कविता मोती, जोत्सना पाटील, सपना पाटील, मुडावदकर मॅडम, वैशाली वाघ, सिंधुताई पाटील, निर्मलाबाई वाघ, इंदिराबाई पाटील, कविता गावित, मेगा माळी, राणूबाई भिल, शितल बोरसे, लताबाई शिंदे, के व्ही टी आर CBSC स्कूल चे शिक्षक व कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले.
योगेश्वर मोरे अध्यक्ष- ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान, कुरखळी
कर्मवीरांचा वसा, संकल्पना, जिद्द जोपासण्याचा पूर्ण प्रयत्न करू. येणार्या काळात विविध क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रमातून सेवेचे कार्य ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान करेल अशी ग्वाही देतो.
आशाताई रंधे- कर्मवीर अण्णाबाबांचे नेहमीच स्त्रीयां विषयी उदारमतवादी धोरण होते. महिलांना शिक्षणासोबत रोजगारातुन परिवार पुढे नेण्यास नेहमी प्रोत्साहन दिले आहे. महात्मा जोतिबा फुले व सावित्री बाई फुले यांचा स्त्रि जातीच्या शिक्षण व हक्क मिळवून देणारा वारसा कर्मवीरांनी नेहमीच जोपासला आहे. आणि त्यांचाच वारसा पुढे नेण्यासाठी कर्मवीरांच्या पावलांवर पाऊल ठेवत हे काम ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करत आहेत.
हमारी आंखो मे ज्वाला है !
आप हमे प्रकाश दो !!
हमारे हातो मे पृथ्वी है !
आप हमे आकाश दो !!
हमे ओर कुछ नही चाहिये !
एक व्यक्ति होणे का एहसास दो !!