कोणी काहीही सांगो मात्र आमदार अमरिशभाई पटेल डॉ हिना गावीतांसोबतच….

बातमी कट्टा:- नंदुरबार लोकसभा निवडणूकीत खासदार डॉ हिना गावीत यांना गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी शिरपूर तालुक्यातील मतांची आकडेवारी महत्वाची ठरली होती.यावेळेस शिरपूर तालुक्यातील दोनही आमदार भाजप पक्षासोबत असल्याने शिरपूर तालुक्यातून यावेळेसच्या खासदार गावीतांना मतांमध्ये पुर्वी पेक्षा जास्त मत मिळू शकतील अशी चर्चा एकीकडे सुरु आहे तर दुसरीकडे आमदार अमरिशभाई पटेल यांची नेमकी भुमिका काय असणार याबाबत वेगवेगळ्या पध्दतीने तर्कवितर्क लावण्यात येत आहे.मुळात आमदार पटेलांनी एका कार्यक्रमात स्पष्टपणे जाहीर केले होते की ते यावेळेस शिरपूर तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने खासदार गावीतांना मत देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. यामुळे आमदार पटेलांची भुमिका यावरून स्पष्ट झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने खासदार डॉ हिना गावीतांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यापुर्वी खासदार गावीत या निवडणूकीच्या तयारीला लागल्या होत्या.भटाणे येथे उज्वला गॅस वाटपचा कार्यक्रम सुरु असतांना बिजेपी पक्षाने नंदुरबार लोकसभा निवडणुकीत डॉ हिना गावीतांना उमेदवारी जाहीर केली.यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला होता.

यानंतर खासदार डॉ हिना गावीत यांना शिरपूर तालुक्यातील आमदार अमरिशभाई पटेल मदत करणार नाहीत असा तर्क लावण्यात येत होता शिरपूर तालुक्यात खासदार डॉ हिना गावीत आमदार अमरिशभाई पटेलांना विश्वास घेत नाहीत. डॉ हिना गावीतांच्या बँनरवर आमदार पटेलांचा फोटो राहत नाही त्यामुळे आमदार पटेल डॉ हिना गावीतांना मदत करणार नाहीत अशी चर्चा होती.

मात्र आमदार अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील बिजेपीच्या एका कार्यक्रमात स्पष्ट सांगितले होती की, कोणी काहीही सांगो मात्र आमदार अमरिशभाई पटेल डॉ हिना गावीतांसोबत आहेत.यामुळे आमदार अमरिशभाई पटेलांची भुमिका यावेळी स्पष्ट झाले आहे.शिरपूर तालुक्यातील आमदार अमरिश पटेल आणि आमदार काशिराम पावरा दोघेही आमदार डॉ हिना गावीतांसोबत असतील तर डॉ हिना गावीत यांना खासदारकीच्या खुर्चीवर बसवण्यासाठी शिरपूर तालुक्यातून गेल्या खासदारकीला मिळालेल्या मतांच्या आकडेवारी पेक्षा या निवडणूकीत मतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.प्रचारातील प्रत्येक कार्यक्रमात किंवा अर्ज दाखल करतांना प्रत्येक ठिकाणी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा किंवा भूपेशभाई पटेल डॉ हिना गावीतांसोबत असल्याने कोणी काहीही सांगो आमदार अमरिशभाई पटेल डॉ गावीतांसोबत आहेत हे नक्की !

WhatsApp
Follow by Email
error: