
बातमी कट्टा:- राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांची उद्या दि ९ जून रोजी शिरपूरात जल्लोषात जयंती साजरी होणार आहे.जयंतीनिमीत्त संपूर्ण शिरपूर शहरात भगवे झेंडे लावल्यामुळे शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले आहे.

शिरपूर शहर व तालुका क्षत्रिय राजपूत समाजातर्फे उद्या दि ९ रोजी शिरपूर शहरात महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.याबाबत उत्सव समितीकडून आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 4 वाजता क्रांतीनगर येथून मिरवणूकीला सुरुवात होणार असून दादूसिंग कॉलनी येथील इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल येथे मिरवणूकीची सांगता होऊन येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी यासाठी उत्सव समितीच्या वतीने तयारी सुरु आहे.शहरात संपूर्ण भगवामय वातावरण निर्माण झाले आहे.महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीसाठी मिरवणूकीत व व्याख्यानाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आव्हान महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
