
बातमी कट्टा:- नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली असुन अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी अडचणी येत असतात अश्या विद्यार्थ्यांना मदत मिळावी या चांगल्या हेतूने गोवाल पाडवी यांनी भेटीदरम्यान हार तुरे ऐवजी शैक्षणिक साहित्य स्वीकार करण्याचा संकल्प घेतला आहे.

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत नुकतेच विजयी झालेले खासदार गोवाल पाडवी यांनी सर्व मित्र परिवार ,कार्यकर्ते आणि हितचिंतक यांना आवाहन केले असून त्यात म्हटले की आपल्या सर्वांच्या माध्यमातून गरजु विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्याचा आहे.लोकसभा निवडणुकीत सर्व मित्र परिवार ,कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचा सर्वांच्या आशीर्वादाने विजय संपादन केला आहे. आपल्या भेटीला येत आहे हार-तुरेऐवजी शैक्षणिक साहित्य स्वीकार करण्याचा संकल्प केलेला आहे.सत्कारासाठी आपण फुलहार आणि शाल आदी वस्तू आणतात मात्र त्याचा उपयोग काही क्षणापर्यंत असतो त्या फुलहार मधील फुले कोमजले तर त्याचा उपयोग होत नसतो मात्र आपण दिलेल्या वही आणि पेन आपल्या भागातील अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वर्षभर हसू आणेल त्याचा शैक्षणिक गरजा पूर्ण होतील या चांगल्या समाजाच्या निर्मित्तीसाठी आपण सर्वांनी नवनिर्माण करण्याचा एक संकल्प करूयात . नंदुरबार लोकसभा मतदार संघातील गरजु विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये म्हणून आपण सर्वानी एक पाउल पुढे येऊ असे आवाहन गोवाल पाडवी यांनी केले आहे.
