शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील बिजेपीचा बडा नेता महाविकास आघाडीच्या वाटेवर ?

बातमी कट्टा:- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात मारलेली मुसंडी बघून येत्या विधानसभा निवडणुकीचे चित्र देखील वेगळे बघायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा निवडणुकीत देखील बिजेपीचा एक बडा नेता महाविकास आघाडीकडून लढणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

या लोकसभा निवडणुकीत धुळे आणि नंदुरबार मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने बाजी मारली.धुळे आणि नंदुरबार या दोन ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेस पक्षाचे खासदार विराजमान झाले आहेत.यामुळे महाविकास आघाडीकडून या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीवर रणनिती सुरु झाली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात बिजेपीचे आमदार जयकुमार रावल यांची एकहाती सत्ता आहे. बिजेपीचे मोठं नेतृत्व म्हणून आमदार जयकुमार रावल यांच्याकडे बघितले जाते.तिनवेळा आमदार म्हणून त्यांनी बहुमान मिळवला आहे.कदाचित यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघावर जास्त लक्ष लागून आहे.

या शिंदखेडा मतदार संघातील तालुक्यातील एक प्रतिष्ठीत बिजेपीचा नेता महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या नेत्याला महाविकास आघाडीतर्फे शिंदखेडा मतदार संघात उमेदवारी दिली जाणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.नुकत्याच लोकसभा निवडणुकीत धुळे आणि नंदुरबार लोकसभेत महाविकास आघाडीने खेळलेली रणनिती बघता शिंदखेडा मतदारसंघातील महाविकास आघाडीची ही रणनिती काय असणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: