
बातमी कट्टा:- बाळेगाव शिळफाटा येथील राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) गट क्र ११, नवी मुंबई कॅम्पकरिता सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीदरम्यान अत्यवस्थ झालेल्या धुळे येथील तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.पोलीस भरती दरम्यान शनिवारी अमळनेर तालुक्यातील उमेदवार तरुणाचा मृत्यू झाला होता.गेल्या पाच दिवसांत अन्य ६ अत्यवस्थ उमेदवारांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होता.

शनिवारी बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती. पुरुष उमेदवारांमध्ये ५ कि.मी. धावण्याची चाचणी सुरू असताना ७ उमेदवारांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांना तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अमळनेर येथील अक्षय मिलिंद बिऱ्हाडे वय २५ या तरुणाचा मृत्यू झाला होता.तर यातील प्रेम सुखदेव ठाकरे (२९) या अमित गायकवाड (२०), पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर अदाटकर (२३), साहिल किशोर लावण (१९) या सर्वांवर छत्रपती शिवाजी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांना पाच दिवसानंतर यातील धुळे शहरातील देवपूर भागातील शिवपार्वती कॉलनीत राहणारा प्रेम सुकदेव ठाकरे याचा मृत्यूशी झुंज देतांना आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.प्रेम हा धुळे येथे होमगार्ड म्हणून काम सांभाळत होता.त्याच्या पश्चात आई-वडील भाऊ बहीण असा परिवार होत.