
बातमी कट्टा:- खान्देशातील प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथिल विठ्ठल रुख्मिनी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सकाळपासून भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

पहाटे 4 वाजता विठ्ठल रुख्मिनी यांच्या मूर्तीचे अभिषेक, पूजा व आरती होईल, सकाळी 6 ते 6.30 काकड आरती, भजन, सकाळी 7 वाजता विष्णुसहस्र नाम जप, पसायदान, दैनंदिन आरती, तसेच 7.30 ला महापूजा, दिंडीचे स्वागतसह अन्य सोपस्कार पार पडले.

विक्रेत्यांसाठी मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून दुकानदार दुकाने थाटून सज्ज झाली आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी शिरपूर शहर पोलीस ठाण्यांचे पोलिस पथकाच्या मार्गदशनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच भाविकांना सुलभ दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून अनिरुद्ध बाबा अकॅडमी शिरपूर यांचे 150 पेक्षा जास्त स्वयंसेवक देखील सेवेसाठी दरवर्षी प्रमाणे सहकार्य करणार आहेत. याचबरोबर आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्न कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले आहेत.
