
व्हिडिओ साठी लिंक क्लिक करा https://youtu.be/P76_m2__6u4?si=rNafS38rkmRau4ae
बातमी कट्टा:- मुख्यमंत्री यांच्या धुळे जिल्हा दौराआधी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना पोलिसांनी राहत्या घरुन ताब्यात घेतले आहे.धुळे येथून शामकांत सनेर यांना शिरपूर पोलिस स्टेशन येथे स्थानबद्ध केले आहे.
व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/P76_m2__6u4?si=rNafS38rkmRau4ae
मुख्यमंत्री दौराच्या पुर्वसंध्येला विश्व आदिवासी दिन दि ९ ऑगस्ट रोजी साक्री तालुक्यातील भाडणे येथील आदिवासी कुटूंबाची झोपडी जमीनदोस्त केल्याचा आरोप करत व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदान मिळत नसल्याने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी निषेध व्यक्त केला होता.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धुळे जिल्ह्यातील साक्री दौरा दरम्यान अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई म्हणून श्याम सनेर यांना धुळे येथून ताब्यात घेत शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे स्थानबद्ध केले आहे.
व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/P76_m2__6u4?si=rNafS38rkmRau4ae
श्याम सनेर यांना शिरपूर पोलिस स्टेशन येथे आणण्यात आल्याची माहिती मिळताच शिरपूर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिरपूर शहर पोलिस स्टेशन येथे गर्दी केली आहे.पोलिस स्टेशन बाहेर कार्यकर्ते यांनी शासनाचा निषेध व्यक्त केला.
व्हिडिओसाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/P76_m2__6u4?si=rNafS38rkmRau4ae