
बातमी कट्टा:- तरुण पिढीला दारुच्या व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी अथक प्रयत्न करत पारोळा तालुक्यातील बोळे येथे दारु मुक्त घर दारु मुक्त गाव अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस व्यसनाधीनताचे प्रमाण वाढत आहे.या व्यसनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे.या वाढत्या व्यसनाधीनतेच्या प्रमाणाला कुठेतरी आळा बसावा यासाठी बोळे येथे दारु मुक्त घर दारु मुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे.
दि १८ ऑगस्ट रोजी पारोळा तालुक्यातील बोळे येथील ग्रामपंचायत प्रांगणात दारु मुक्त घर दारु मुक्त अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात मोफत व्यसनमुक्ती उपचार शिबिर घेण्यात येणार आहे.या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन अमेरीका स्थित कैलास गिरासे आणि डॉ जितेंद्र गिरासे यांनी केले आहे.
या शिबीरात व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य तज्ञ डॉ कृष्णा रामचंद्र भावले हे मार्गदर्शन व उपचार करणार आहेत.डॉ कृष्णा भावले यांनी आजतागायत व्यसनमुक्ती व मानसिक आरोग्य संदर्भातील एक लाख रुग्णांवर उपचार केले आहेत. या अभियानासाठी बोळे,ढोली,,वेल्हाने,शेवगे आणि बोळे तांडा येथील युवाशक्ती अथक परिश्रम घेत आहेत.
डॉ जितेंद्र गिरासे :- 9890048411
संपर्क कैलास गिरासे :- 6351998643
नाव नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/nkmMxzdqUqw9NuRu8