बेपत्ता तरुणाचा केळीच्या शेतात आढळला मृतदेह…

बातमी कट्टा:- मध्यप्रदेश राज्यातील तरुणाचा महाराष्ट्रातील शिरपूर तालुक्यातील कुरखळी शिवारातील केळीच्या शेतात मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना आज दि 11 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. मृतदेहाजवळ मोटरसायकल व बॅग मिळुन आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 11 रोजी सकाळच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग लगत शिरपूर तालुक्यातील कुरखळी शिवारातील केळीच्या शेतात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत थाळनेर पोलिसांना संपर्क करत घटनेची माहिती दिली.घटनास्थळी थाळनेर पोलिस स्टेशनचे पथक दाखल झाल्यानंतर मृतदेह जवळ पोलिसांना बॅग मिळुन आली त्यात आधारकार्ड व काही कागदपत्रे मिळून आली व एमपी 46 झेड.डी 7577 क्रमांकाची मोटरसायकल मिळुन आली.

दोन ते तीन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन करुन तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आले. घटनेची चौकशी केली असता तरुणाचे नाव प्रकाश मोहनसिंग सोलंकी असे असून मध्यप्रदेश राज्यातील बडवानी येथील पोलिस स्टेशन येथे मृत प्रकाश सोलंकी बेपत्ता असल्याची नोंद असल्याचे पोलिसांना समजले. थाळनेर पोलिसांनी या घटनेबाबत बडवाणनी पोलिसांना माहिती देत मृत प्रकाश सोलंकी याच्या परिवाराला माहिती देण्यात आली. प्रकाश सोलंकी हा फायनान्स मध्ये काम करत होता मात्र त्याने महाराष्ट्रात येऊन आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळुन शकलेली नाही.

WhatsApp
Follow by Email
error: