
बातमी कट्टा:- गणपती विसर्जन मिरवणूक सुरु असतांनाच मिरवणुकीतील ट्रॅक्टर भावीकांच्या अंगावर घुसला यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरालगत असलेल्या चितोड गावात आज दि. १७ रोजी एकलव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरु होती.यावेळी मिरवणूकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टर वरील चालकाचा तोल गेल्याने ट्रॅक्टर समोर असलेल्या भाविकांच्या गर्दीत घुसला.घटनास्थळी धाव घेत जखमींना धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान या अपघातातील परी शांताराम बागुल वय १३ ,शेरा बापू सोनवणे वय ६ आणि लड्डू पावरा वय ३ या तीन बालकांचा मृत्यू झाला तर गायत्री पवार वय २५,विद्या भगवान जाधव वय २७,अजय रमेश सोमवंशी वय २३ ,उज्वला चंदे मालाचे वय २३,ललिता पिंटू मोरे वय १६,रिया दुर्गेश सोनवणे वय १७ या जखमींवर उपचार सुरू आहेत.