दुर्दैवी घटना, भाऊ बहिणीचा तापी नदीत बुडून मृत्यू

बातमी कट्टा:- घटस्थापना पुर्वी घरातील कानबाई मातेला तापी नदीत अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि २ रोजी सकाळच्या सुमारास घडली.परिवारासोबत गावाजवळील तापी नदीपात्रात गेले असतांना सदरची घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील सुरेश अंकुश पाटील व रमेश अंकुश पाटील या दोन्ही भावांचा परिवार घटस्थापनेच्या पुर्वी घरातील कानबाई मातेचे आंघोळीसाठी तापी नदी काठावर गेले होते.यावेळी सुरेश पाटील यांची मोठी मुलगी वैष्णवी पाटील वय १७ आणि रमेश पाटील यांचा मोठा मुलगा उत्कर्ष पाटील वय १३ हे दोघे तापी नदी काठावर पाण्यात असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने वैष्णवी पाटील आणि उत्कर्ष पाटील दोघेही बहीण भाऊ पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली यावेळी दोघांचा शोध कार्य सुरु असतांना घटनेच्या एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी यांचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आला.

तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असतो यामुळे नदीपात्रात मोठं मोठ्या प्रमाणात खड्डे असून नदीपात्रातील वाळू उपसा मुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यातील अंदाज न आल्याने वैष्णवी आणि उत्कर्ष या दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: