
बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना दि ९ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या अपघातात बस वाहकासह तीन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत.बस चालकाची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील धुळ्याच्या नगावबारी जवळ ऑक्सिजन सिलेंडर वाहतूक करणाऱ्या एम एच १८ एए ९९२५ क्रमांकाचे ४०७ वाहन बंद पडला होता.तो ट्रक घेऊन जाण्यासाठी दुसरे वाहन (टोचण वाहन ) आले होते.काम सुरु असतांनाच धुळ्याकडून शिंदखेडाकडे जाणाऱ्या एम एच २० बीएल ३१२६ क्रमांकाचा बसने समोर उभे असलेल्या टोचन वाहन व ४०७ वाहनाला धडक दिली.यात बसचे वाहक नरेंद्र अरुण पाटील रा.कमखेडा हे समोरील काच फुटून टायर खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर टोचण वाहनासोबत असलेल्या शिवाजाज पावरा, सुभाष मडके यांचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघाताच्या घटनेनंतर तात्काळ नागरिकांनी मदतकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.या अपघातात बस चालक रिंकू गोसावी यांची प्रकृती गंभीर असून बस मधील ७ ते ८ कर्मचारी जखमी झाले आहेत.रिंकू गोसावी यांच्यावर धुळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.