नगरसेवक पासून राजकीय सुरुवात आमदार जयकुमार रावल आज घेतील मंत्रीपदाची शपथ

बातमी कट्टा:- नगरसेवक पासून राजकीय कारकीर्दला सुरुवात झालेले आमदार जयकुमार रावल हे आज नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.यापुर्वी आमदार जयकुमार रावल 2016 साली कॅबिनेट मंत्री म्हणून विराजमान होते.

आज नागपूर येथे भाजपचे आमदार जयकुमार रावल मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.त्यांना हायकमांडकडून फोन आला होता.आमदार जयकुमार रावल यांचे काही कार्यकर्ते देखील नागपूर येथे दाखल होत आहेत.आमदार जयकुमार रावल यांचा आता पर्यंतचा राजकीय प्रवास बघितला तर दोंडाईचा नगरपालिका येथे नगरसेवकापासून आमदार जयकुमार रावल यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता.आमदार रावल यांनी २८ व्या वर्षी तत्कालीन मंत्र्यांचा पराभव करुन विधानसभेत स्थान मिळवले होते. 2016 साली आमदार रावल यांना कॅबिनेट मंत्री म्हणून रोहयो, पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार सांभळला होता.2004 ते 2024 सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा महायुतीचे सर्व 5 आमदार विजयी असून यात आमदार जयकुमार रावल यांचा मोठा वाटा असल्याचे सांगण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: