शिवशाही बसला आग,बस जळून “खाक”

बातमी कट्टा:- मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर शिवशाही बसला आग लागून संपूर्ण शिवशाही बस जळून खाक झाल्याची घटना सायंकाळी गोराणे फाट्यानजीक घडली.टायर फुटल्याने संपूर्ण बसने पेट घेतल्याचे सांगितले जात असून सुदैवाने जिवीतहानी टळली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील गोराणे फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाची धुळ्याकडून शिरपूरकडे जाणारी विनावाहक शिवाशाही बसचा मागील टायर फुटल्याने संपूर्ण बसने पेट घेतला. चालक प्रदीप भरतसिंग पवार यांनी तात्काळ सर्व बसमधील चालकांना सुखरुप बाहेर काढले.काही क्षणातच आगीमुळे संपुर्ण बसने पेट घेतली.घटनास्थळी जिंदाल पावर कंपनीची अग्निशमन वाहनाद्वारे आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली.

घटनास्थळी नरडाणा पोलिसांनी धाव घेत मदतकार्य केले.वेळीच चालकाने टायर फुटल्याने सर्व प्रवासींना बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.यामुळे काही वेळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.

WhatsApp
Follow by Email
error: