
बातमी कट्टा: शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्यचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर शनीवारी अर्थात २८ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच जिल्ह्यत येत असुन त्यांचे दोंडाईचा येथे भव्य मिरवणूक, स्वागत सोहळा संपन्न होत असून त्यांच्या स्वागतासाठी दोंडाईचा नगरी सजवण्यात आली आहे.
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांची राज्याच्या मंत्रीमंडळात सामावेश झाल्यानंतर ते पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यात येत असून आपल्या भुमीपुत्र राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबीनेटमंत्री झाला असून त्यांचे आगमनानिमित्ताने भव्य असे भव्य स्वागत, मिरवणूक व नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांच्या स्वागतासाठी दोंडाईचा नगरी पूर्णपणे सजली असून शहरात चौकाचौकात बॅनर, स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत, त्या दिवशी जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी, ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, क्रेन च्या साहाय्याने असे मोठ्या फुलहाराने स्वागत असा भरगच्च व भव्य असा स्वागत कार्यक्रम संपन्न होणार आहे.
अशी असेल मंत्री रावल यांची स्वागत मिरवणूक
शनिमंदिर येथून सुरुवात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, पिंपळ चौक, वीरशिरोमणी महाराणा प्रताप पुतळा, राजे दौलतसिंह पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शहीद अब्दुल हमीद पुतळा, राजपथ मार्ग, शिवस्मारक नंदुरबार, दादावाडी जवळील शिवपथ, राम मंदिर अशी मिरवणूक करीत निर्मल चौक येथे भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
