
बातमी कट्टा:- राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यात येत असल्यामुळे भाजपाच्या वतीने त्यांच्या जंगी आगमन, स्वागत व नागरी सत्कार कार्यक्रम शनिवारी दि. २८ रोजी आयोजित करण्यात आला होता परंतु देशाचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांचे काल दुखद निधन झाल्यामुळे हे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यात येत असल्यामुळे भाजपाच्या वतीने दोंडाईचा शहरात त्यांचे जंगी स्वागत व नागरी सत्कार कार्यक्रम शनिवारी दि. २८ रोजी आयोजित करण्यात आला होता परंतु देशाचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांचे काल दुखद निधन झाल्या नंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याने मंत्री रावल यांच्या स्वागताचे सर्व कार्यक्रम तुर्त स्थगित करण्यात आले आहेत.
